About Us

Vasai Sagari Masemar Sahakari Patpedhi Maryadit

वसई तालुका सागरी मासेमार सहकारी पतपेढी मर्यादित,अर्नाळा.

१. पतपेढीची स्थापना

      १०० वर्षापूर्वी वसईतील चारही गावात सेवा संस्थांची निमिर्ती होवून मच्छिमार समाजाला लागणा—या साहित्यांची गरजा भागवत होत्या.परंतू आपल्या मच्छिमार गावातील राहत्या घरांना ७/१२ नोंद नसल्यामुळे राष्ट्रीय बॅंका,सहकारी बॅंका,खाजगी बॅंका अशा असंख्य वित्तपुरवठा करणा—या संस्था मच्छिमारांना कर्ज देत नव्हत्या.अशा परिस्थितीत चारही गावातील अर्नाळा,वसई,खोचिवडे व नायगांव गावांतील कार्यकर्ते एकत्र येवून सुरूवातीला ५०० सभासद संख्या करण्याचे व भागभांडवल १,५०,०००/— जमा करून मा.सहनिबंधक श्री.सुनिल देशमुख साहेबांनी दि.७/५/१९९२ रोजी संस्थेचे रजिस्ट्रेशन केले.व त्या वेळेपासून पतसंस्था अस्तित्वात आली.

२.पतपेढी स्थापनेची उद्दीष्टे काय?

      स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोळी बांधव खोल समुद्रात मासेमारी करून आपल्या कुटूंबाचा उदानिर्वाह करीत होता.अशावेळी त्या मच्छिमाराला व्यवसायासाठी सावकार व बाजारातील व्यापा—यांकडून तुटपुंजी रक्कम घेवून त्या रक्कमेपोटी अव्वाचे—सव्वा व्याज आकारणी व कसर लावून व्याज आकारीत होता. सर्वांमुळे मच्छिमार समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची होती.हे जाणून त्यावेळच्या धुरिणांनी एकत्र येवून आपल्या मच्छिमार समाजाची पतसंस्था/बॅंक का असू नये?म्हणून पतपेढीची निर्मिती करण्यात आली.

३. समाजाला पतपेढीचा फायदा कसा झाला?
     देशाला स्वातंत्र्य मिळाले.परंतू आपल्या मच्छिमार समाजाला जिवन जगण्यासाठी लागणा—या गरजा कोण भागवणार.अशा परिस्थितीत पतपेढीच्या निर्मितीतून अर्नाळा, अर्नाळाकिल्ला,चिखलडोंगरे,वसई,खोचिवडे व नायगांव गावातील प्रत्येक मच्छिमारांच्या घरोघरी पतपेढीने प्रवेश करून जामिनकी कर्ज,सोनेतारण कर्ज,शैक्षणिक कर्ज,तारणी कर्ज,बोट कर्ज, वाहनकर्ज,घरदुरूस्ती/नविन घर बांधण्यासाठी,कॅशक्रेडिट कर्ज,पगारतारण कर्ज अशा असंख्य योजनांमधून समाजाला आर्थिक साहाय्य करून त्यांचा सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक दर्जा उचावण्याचे प्रयत्न चालू आहेत.

४. पतपेढीची आजपर्यंतची वाटचाल
       सुरूवातीला सभासद संख्या ५०० होती.भागभांडवल रू.१,५०,०००/— पर्यंत मर्यादित होते.आता पतपेढीची आर्थिक परिस्थिती— सभासद संख्या—७,५००/—,वसूल भागभांडवल रू.२ कोटी ७ लाख,ठेवी रू.३६ कोटी,कर्जवाटप रू.२४ कोटी ३१ लाख व खेळते भांडवल रू.४५ कोटी पर्यंत आहे.

५. शाखा किती आहेत व कुठे आहेत?

१.अर्नाळा, २.वसई, ३.खाचिवडे व ४.नायगांवशाखा अशा चार शाखा आहेत.

६.सभासद संख्या किती आहे?
    सभासद संख्या ७,५०० आहे.

७. व्यवसायाची माहिती
    सुरूवातीचा काळ फक्त कर्जाऊ रक्कम रू.१०,०००/— पर्यंत होती .तद्‌नंतर आता १ लाख पतकर्ज व तारणी कर्ज ४० लाखापर्यंत देण्यात आलेली आहेत.

शैक्षणिक कर्ज — देशांतर्गत १० लाखापर्यंत व परदेशात २० लाखापर्यंत— व्याजदर मुलींसाठी ९.५०ः,मुलांसाठी १०ः  
बोटकर्ज — जास्तीत—जास्त ४० लाखापर्यंत
वाहनकर्ज — व्हॅल्युएशनच्या ७५ः पर्यंत
गॄहकर्ज — नविन घरासाठी/घरदुरूस्तीसाठी म्डप् पध्दतीने २० लाखापर्यंत कॅशक्रेडिट — व्यवसायासाठी १ वर्षाच्या मुदतीने — कर्जाच्या दुप्पट तारण दयावे लागेल.
पगारतारण कर्ज — ज्या ठिकाणी काम करीत असेल त्या कंपनीचे किंवा आस्थापनाचे हमी पत्र ४९ च्या अधिन राहून जी रक्कम बसेल ती रक्कम.

Board of Directors

Founder Members

नाव पत्ता
श्री. फिलिप बस्त्याव मस्तान वसई
कै. रामचंद्र नाना भोईर अर्नाळा
कै. नारायण पांडुरंग पाटील अर्नाळा
कै. रामचंद्र बुधाजी कोळी अर्नाळा
कै. रघुनाथ दादन वैती खोचिवडे
श्री. पावलू अंतोन अलिबाग वसई
श्री. फिलिप मंगळया सजन वसई
श्री. गोविंद वालजी दिंडेकर नायगाव
श्री. इनास पास्कू डेडू अर्नाळा
कै. झुजू फिलिप धाकी अर्नाळा
श्री. रामचंद्र पांडुरंग कोळी अर्नाळा
कै. संज्याव पेद्रु आप्पा वसई
कै. आकलेस झुज्या गंडा अर्नाळा

 

 

नाव पत्ता
कै. आत्माराम रतन मोठे (कोळी) नायगाव
कै. हरेश्वर कृष्णा घाणेकर नायगाव
कै. वसंत बास्कर बावकर खोचिवडे
कै. झुज्या पेद्रु तयबू वसई
श्री. फिलिप फ्रान्सिस चांदी वसई
श्री. नारायण शंकर खाटेकर वसई
कै. रमेल जयराम लीली अर्नाळा
श्री. बस्त्याव फ्रान्सिस घट्या वसई
कै. नारायण लक्ष्मण परेकर अर्नाळा
श्री. मोहन नारायण वैती खोचिवडे
श्री. नामदेव सोवार देवाचा वसई
कै. अगोस्तिन फ्रान्सिस नांगर्‍या अर्नाळा
श्री. वसंत पांडुरंग कारभारी नायगाव
कै. पांडुरंग सुकुर खारकंडी अर्नाळा

 

रौप्य महोत्सवी सोहळा